Dhurandhar Movie star cast


Dhurandhar Movie star cast : 2025 धुरंदर सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आणि 2025 च्या अखेरीस बॉलिवूडमध्ये एक मोठा ॲक्शन पट थ्रिलर सिनेमा प्रदर्शित होणार हे निश्चित झाले, सध्या सोशल मीडियावर धुरंदर सिनेमाच्या कथेची जोरदार चर्चा सुरू आहे. धुरंधर या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शक आदित्य धर पुन्हा एकदा रणवीर सिंगसह दमदार कथानकाचा विस्फोट करणार आहेत. आज आपण या सिनेमाच्या स्टार कास्ट, रिलीज डेट आणि इतर महत्त्वाच्या बाबींची माहिती घेणार आहोत.

Dhurandhar Movie star cast
Dhurandhar Movie star cast

Dhurandhar Movie star cast

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंगची अनोखी भूमिका उत्सुकता वाढवणारी आहे. त्याने या सिनेमात एका धमाल व्यक्तिरेखेला साकारले आहे, जी त्याच्या *घायाळ* सिरीजपेक्षा वेगळी असेल, अशी चर्चा आहे .

रणवीर सह दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळतेय. संजय दत्त, आर.माधवन, अक्षय खन्ना, आणि अर्जुन रामपाल इ.

आर माधवन याच्या वेगळ्याच गेटअप मुळे तो या सिनेमात अजित डोवाल यांची भूमिका साकारतोय अशी चर्चा आहे

Release Date

सत्य घटनेवर आधारित असलेला हा चित्रपट 2025 च्या डिसेंबर महिन्यात प्रदर्शनाची तारीख ठरली आहे. त्याच दरम्यान साऊथचे देखील सिनेमे रिलीज होणार असल्याने धुरंदरच्या निर्मात्यांनी 5 डिसेंबर ही तारीख निवडली आहे. याच दरम्यान प्रभास चा द राजा साहेब हा सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे त्यामुळे बॉक्स ऑफिसवर कोण वरचढ ठरते हे पाहणे रोमांचक असणार आहे.

बॉलीवूड vs साउथ अशी लढत डिसेंबर 2025 मध्ये पाहायला मिळणार आहे. “बॉलिवूड vs साऊथ”ची लढत चाहत्यांसाठी एक उत्स्फूर्त अनुभव ठरणार आहे.

Dhurandhar Movie star cast
Dhurandhar Movie star cast

दिग्दर्शन

आदित्य धर “उरी” च्या यशाचे सूत्रधार आदित्य धर या सिनेमाचे दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक आहेत. उरी: द सर्जिकल स्ट्राइक च्या यशानंतर त्यांच्या कथानकांवर चाहत्यांचा विश्वास वाढला आहे. त्यांची शैली म्हणजे राष्ट्रीय भावनांना स्पर्श करणारे आणि ॲक्शनला वाव देणारे दृश्य “धुरंधर” मध्येही हे सूत्र तसेच राहील, अशी अपेक्षा आहे सिनेमाचा थीम: कथा काय असेल याबाबत अद्याप अधिकृत माहिती नसली तरी इंडिया फोरम्सच्या रिपोर्टनुसार सदर सिनेमा हा मेजर मोहित शर्मा यांच्यावर आधारित आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ही कथा एका गुप्तचर एजंटच्या वेगळ्या प्रकारच्या ॲक्शन वर आधारित असेल. रणवीरची भूमिका “बदला” आणि “सत्याच्या शोधातील” असणार आहे, जी घायाळ सिरीजपेक्षा वेगळी असेल. रणवीर सिंगच्या चाहत्यांची संख्या आणि इतर दिग्गजांचा सहभाग हा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवेल.

हा 2025 चा अशी अपेक्षा करण्यासारखा सिनेमा आहे, जो ॲक्शन, थ्रिल आणि स्टार पॉवरचा संगम घेऊन येणार आहे. रणवीर सिंग आणि आदित्य धरची जोडी पुन्हा एकदा बॉलिवूडला साउथ सिनेमा पुढे तारेल का ? तुम्हाला वाटते का की धुरंधर प्रभासच्या द राजासाहेब चित्रपटाच्या स्पर्धेला तोंड देऊ शकेल? कमेंटमध्ये आपले मत नक्की सांगा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top