Oats Superfood Benefits in Marathi : जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रित ठेवायचे आहे आणि फास्ट फूड, जंक फूड पासून लांब राहायचे आहे. तर तुमच्यासाठी ओट्स एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ओट्स हे विटामिन्स आणि फायबर्स यांचा उत्तम स्त्रोत आहेत. ओट्स हे एक हेल्दी फूड आहे ओट्स पासून अनेक पदार्थ बनवले जातात सदर लेखांमध्ये आपण ओट्स चे अनेक फायदे (Oats Benefits in Marathi) जाणून घेऊ.

ओट्सचे फायदे Oats Benefits in marathi
Oats हे एक पूर्ण अन्न आहे, यामध्ये अँटिऑक्सिडंट, फायबर, आयरन, झिंक, मॅगनीज आणि विटामिन बी मुबलक प्रमाणात असतात. ओट्सच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल लेव्हल आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत
फायबर्स आणि अँटि ऑक्सिडंट यांचा मुबलक स्त्रोत असलेल्या ओट्सच्या सेवनाने हृदयाच्या आरोग्यात सुधारणा होण्यास मदत होते. यामध्ये आढळणारे बीटा ग्लुटेन आणि सोल्युबल फायबर्स हे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात. ज्या व्यक्तींना हृदया संबंधित समस्या आहे त्यांनी आपल्या आहारात ओट्सचा समावेश करायला हवा.
रक्तातील साखरेचे प्रमाण
दैनंदिन आहारामध्ये ओट्स चा समावेश केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. स्थूल आणि टाईप २ मधुमेहांच्या रुग्णांसाठी ओट्सचे सेवन उत्तम ठरते. ओट्स मध्ये आढळणारे बीटाग्लुटेन, फायबर्स हे शरीराची ग्लायकेमिक इंडेक्स नियंत्रित ठेवतात.
वजन कमी करण्यास मदत
ओट्स मध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात यामुळे ओट्स चे सेवन हे तुमचे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते, ओट्स खाल्ल्याने पोट हे भरलेले राहते. यामुळे वजन नियंत्रित होण्यास मदत होऊन पचनक्रिया सुधारते तसेच अपचन, बद्धकोष्ठता इत्यादी पोटाच्या समस्या दूर होतात.
केसांसाठी उत्तम
ओट्सचे अनेक फायदे आहेत ओट्सचा हेअर मास्क लावल्याने केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच स्काल्पला सुटणारी खाज, कोंडा, केस गळणे- तुटणे इत्यादी समस्या कमी होतात. ओट्सच्या हेअर मास्कचा वापर केल्याने वरील समस्या सुटतातच तसेच केस मजबूत देखील होतात.
ओट्स सेवनाने रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होऊन त्वचा देखील चांगली होते. ओट्स चे अनेक फायदे आहेत. भारतात ओट्सची लागवड प्रामुख्याने पंजाब, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश इत्यादी ठिकाणी केली जाते.
ओट्समधील कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स दिवसभर ऊर्जा देतात .
बीटा-ग्लुकन नावाचा फायबर कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतो .
फायबरमुळे पोट भरलेले राहते, त्यामुळे अतिरिक्त कॅलरीचे सेवन कमी होते
ओट्सचे प्रकार Types of Oats
- स्टील कट ओट्स (Steel-Cut Oats) हे कच्चे ओट्स असतात. यामध्ये साधारणतः ओट्सचे (ओट ग्रोट्स) घेऊन त्यांचे साल काढून टाकले जाते आणि त्यांचे लहान तुकडे केले जातात. यामुळे पचनास वेळ लागतो, परंतु यामध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असते.
- रोल्ड ओट्स (Rolled Oats) हे ओट्स साल काढलेल्या ओट ग्रोट्सना वाफ देऊन चिरडून तयार केले जातात. यामुळे ते सहज पचण्यास योग्य असतात याला मराठीत “ओट्सचे जाडे भरडे पीठ” असेही म्हणतात
- क्विक/इन्स्टंट ओट्स (Quick or Instant Oats) हे ओट्स अत्यंत पातळ चिरलेले असतात. हे ओट्स पॅकिंग अगोदर शिजवलेले असतात, जेणेकरून ते वापरताना केवळ गरम पाणी किंवा दूध घालून खाण्यास लगेच तयार होतात. काही प्रकारांमध्ये साखर किंवा स्वाद वाढवणारे मसाले घालून पॅकिंग केले जातात त्यांना”क्विक कुकिंग ओट्स” म्हणतात.

100 ग्रॅम ओट्सचे पोषणमूल्य Oats Nutrition
| पोषक घटक | प्रमाण |
| कॅलरीज | 389 klcl |
| कार्बोहायड्रेट्स | 66 ग्रॅम |
| फायबर | 10.6 ग्रॅम |
| प्रथिने | 16.9 ग्रॅम |
| स्निग्ध पदार्थ | 0.76 मिग्रॅम |
| व्हिटॅमिन B1 (थायमिन) | 0.76 मिग्रॅम |
| व्हिटॅमिन B5 | 1.34 मिग्रॅम |
| लोह | 4.7 मिग्रॅम |
| मॅग्नेशियम | 177 मिग्रॅम |
| झिंक | 3.9 मिग्रॅम |
| कॅल्शिअम | 54 मिग्रॅम |
| पोटॅशिअम | 429 मिग्रॅम |
ओट्सचा इतिहास History of Oats
ओट्सची उत्पत्ती स्कॉटलंडमध्ये झाली असून हे धान्य पूर्वापार स्कॉटिश अन्नसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग होता. ओट्सचे शास्त्रीय नाव अव्हेना सटायव्हा (Avena sativa) असे असून ती पोएसी कुळातील एक वनस्पती आहे, जी मुख्यतः थंड प्रदेशात उगवते. इजिप्तमधील उत्खननात ख्रिस्तपूर्व २००० च्या काळातील ओट्सचे अवशेष सापडले आहेत, जे त्याच्या प्राचीन वापराचे पुरावे आहेत . भारतात ओट्सचा उल्लेख “जव” असा शब्द वापरून केला जातो, परंतु आधुनिक काळात ते इंग्रजी शब्द “ओट्स” म्हणूनच सामान्यतः ओळखले जाते. सुरुवातीला ओट्स चा वापर पशुखाद्य म्हणून केला जात होता परंतु कालांतराने मानवाच्या आहाराचा मुख्य भाग बनला. पोटचे महत्त्व हे त्यामध्ये आढळणाऱ्या पौष्टिकतेमुळे वाढले. स्वतःला जगभर आरोग्यदायी अन्न म्हणून स्वीकारले गेले.
हे देखील वाचा. – TATA Motors च्या या दमदार कारची बुकिंग झाली सुरु. मिळतोय बंपर Discount.
सदर लेख केवळ सर्वसाधारण माहितीसाठी असून यामध्ये कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या व आहारात योग्य तो बदल करा.
