Vadodara Bridge Collapse : काही वर्षांपूर्वी सावित्री नदीवरील पूल कोसळण्याची घटना आपणास माहीत असेल, तशीच काहीशी घटना आज सकाळी साडेसातच्या सुमारास वडोदरा, गुजरात मधील महिसागर नदीवरील गंभीरा पुल कोसळून अनेक वाहने नदीत पडली, टँकर कोसळलेल्या पुलावर अडकला आहे. गंभीरा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये 5 ते 10 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आनंद आणि वडोदरा जिल्ह्यांना जोडणारा हा पूल आहे.

Vadodara Bridge Collapse
1985 या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. चार दशकांपासून हा पूल वापरात होता, अनेक वेळा या पूलाची दुरुस्ती आणि नूतनकरणाची मागणी या अगोदर करण्यात आली होती. आज सकाळच्या वाहनांच्या वर्दळीत अचानक पूल कोसळला.
या घटनेत 5 पेक्षा अधिक वाहने नदीत पडली असून एका ट्रकच्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर सकाळपासून वायरल होत होता. स्थानिकांच्या मदतीने अनेकांना वाचवण्यास यश आले असून. NDRF आणि स्थानिक यंत्रणेच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले आहे. प्रवाह मोठा असल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहेत. बचाव पथकांनी आतापर्यंत 4 जणांना सुरक्षित बाहेर काढले असून इतर अपघातग्रस्तांचा शोध सुरू आहे.

गुजरात सरकारने या घटनेची सखोल चौकशी चे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत आणि जखमींसाठी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली.
पूल कोसळल्यामुळे वडोदरा- आनंद मार्ग बंद झाल्याने प्रशासनाने वाहनांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करून वाहतूक कोंडी टाळली.
हे देखील वाचा- टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक एसयूव्ही ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद
